१ जानेवारीपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या..! फडणवीस सरकारकडे सुप्रिया सुळे यांची मागणी December 8, 2024December 8, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana On Supriya Sule: महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारची सत्ता आली आहे. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून मिळणार का याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये लवकरच देऊ अशी घोषणा केली. याचा आम्ही नव्या अर्थसंकल्पातून तरतूद काढून महिलांना पैसे देऊ असे विधान त्यांनी यावेळी केले. त्यावर प्रतिक्रिया करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 👇👇👇👇 फक्त या महिलांनाच मिळणार 2100 रुपये; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. राज्यातील नव्या सरकारने आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासूनच 2100 रुपये द्यावे. तसेच महाराष्ट्र राज्याचा हक्क दुसऱ्या कोणत्याही राज्याला देऊ नये. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाच वर्ष महाराष्ट्राची चांगली सेवा करावी. असा टोला सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला लावला आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीचा निकाल आम्हाला शंभर टक्के मान्य नाही. आम्ही यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे गेलो आहोत. राज्यात मिळाली मत अशक्य आहेत. मतदानामध्ये नक्कीच काहीतरी घोळ केला आहे असे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. 👇👇👇👇 फक्त या महिलांनाच मिळणार 2100 रुपये; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील शपथ घेतली आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तब्बल दोन आठवड्यांनी शपथविधी झाला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत. आमचे अपेक्षा आहे की ज्या लाडक्या बहिणीमुळे तुम्ही निवडून आला आहात त्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये प्रतिमा द्यावा. Ladki Bahin Yojana On Supriya Sule 👇👇👇👇 फक्त या महिलांनाच मिळणार 2100 रुपये; लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा आम्ही देशाच्या हितासाठी सहकार्याची भूमिका ठेवू, पण सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकारने काम केली पाहिजे. असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्या विरोधात काम करत आहे. कापूस आणि सोयाबीनला या सरकारच्या काळात भाव नसल्याचे त्यांनी यावेळ सांगितले. या सरकारने सरकारच्या हिताचे निर्णय घ्यायला हवेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे तुम्ही आश्वासन दिले होते तर त्या महिलांना 2100 रुपये एक जानेवारीपासूनच द्या असे त्यांनी यावेळी सांगितले. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा