Accident Video: मुंबईच्या कुर्ला भागात एक भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवले आहे. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सात जण मृत्यू पावले असली तरी जवळपास 31 जण मृत्यूच्या दारातून वाचल्याचे समोर आले आहे. 31 जण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले आहेत. या भयानक अपघाताचे अनेक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येत आहेत. बसणे कशाप्रकारे लोकांना चिरडलं, वाहने उडवले याची भयानक दृश्य व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
