Ladki Bahin Scheme: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला लाडकी बहिण योजनेमुळे प्रचंड बहुमत मिळाले आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहिना 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे 7500 महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. या योजनेच्या जोरावर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळवले. एकट्या बीजेपी ने 132 जागा या निवडणुकीमध्ये जिंकत आल्या. शिंदे गटाला 57 जागा आणि अजित पवार गटाला 41 जागावर विजय मिळवला. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत महायुतीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात लाडके बहिन योजनेचे पैसे 1500 रुपयावरून 2100 रुपये करू असे आश्वासन देण्यात आले होते.