लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यात दीड हजारच मिळणार…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Update: विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश मिळवून देणाऱ्या लाडक्या बहिणींना दर महिना दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वाढ करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र निधीमध्ये तूर्तास वाढ होण्याची शक्यता नसल्याची माहिती समोर येत आहे. वाढीव हप्त्यासाठी मोठी अर्थसंकल्पीय तरतूद करावी लागणार असून त्यासाठी आर्थिक स्थितीचा पुन्हा एकदा आढावा घ्यावा लागेल अशी माहिती राज्याच्या प्रशासनातील वरिष्ठ सूत्राने दिली आहे. Ladki Bahin Yojana Update

डिसेंबर महिन्यात या महिलांना मिळणार 1500 रुपये,

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये करू अशा आश्वासन दिले होते. मात्र आता नव्या सरकारकडून पूर्ण अर्थसंकल्पामध्ये आर्थिक दृष्ट्या शक्य असेल तरच निधी वाढवण्याचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकारच्या पहिल्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पूर्ण अर्थसंकल्प मांडल्याशिवाय निधी वाढवायचा मार्ग सोपा नसल्याचे मानले जात आहे. राज्यावर कर्जाचा बोजा असल्याने योजनेतील निधीमध्ये वाढ केली जाऊ नये असे वरिष्ठ अधिकारी म्हणत आहेत.

डिसेंबर महिन्यात या महिलांना मिळणार 1500 रुपये,

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे सध्या दिले जाणारी दरमहा 1500 रुपये रक्कम कायम ठेवावी अशी सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ही सूचना नव्या सरकारने मान्य केल्यास योजनेतील रक्कम वाढवण्याच्या निर्णयावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. लाडके बहिण योजनेत लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्याचे 7500 देण्यात आले आहेत. आता डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना नेमके किती रुपये मिळणार हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

डिसेंबर महिन्यात या महिलांना मिळणार 1500 रुपये,

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेसाठी वाढीव निधीची आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. मात्र आता ते मुख्यमंत्री नाहीत शिवाय निवडणूक ही पार पडली असून अजून पाच वर्षे तरी नव्या घोषणा करण्याची सरकारला गरज नाही. शिंदे सरकारकडून योजनेवर सढळ हाताने खर्च झाल्याने आता अर्थ मंत्रालय हात आकडता घ्यावा लागणार आहे. या नवीन सरकारांमध्ये अर्थ मंत्रालयाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित असून त्यांना आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

डिसेंबर महिन्यात या महिलांना मिळणार 1500 रुपये,

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे स्वतः अजित पवारही वाढीव निधीच्या आश्वासनाचा फेरविचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिसेंबरमधील पैशाची प्रतीक्षा अजून वाढीव निधीसह दरमहा 2100 रुपये मिळतील अशी लाभार्थ्यांची अपेक्षा आहे. निधीत वाढ केली नाही तर ती मतदाराची फसवणूक ठरेल असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मात्र लोकांना 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते ते पूर्ण झाले का? तरीही लोकांनी भाजपाला मत दिली त्यामुळे योजनेतील निधी वाढवला नाही म्हणून कोणी नाराज होणार नाही असा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment