महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार! या भागात होणार अतिवृष्टी, पहा आजचा हवामान अंदाज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Update: राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतले आहे. दोन ते तीन दिवस झाले पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मात्र आजपासून पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोर धरणार आहे. त्याचबरोबर पुढील दोन दिवसात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

उत्तर महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई मुंबई उपनगरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणारा असून अधून मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहेत. दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Rain Update

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात जोरदार पाऊस होत आहे. या राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने अनेक राष्ट्रीय महामार्गासह 400 हून अधिक रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आले आहे. पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे सर्व रस्ते जलमय झाले आहेत. पावसाच्या रुद्रवतारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील तीन-चार दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असून हवामान खात्याने मध्य पदेश आणि छत्तीसगड सह अठरा राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ओडिसा, पश्चिम बंगाल आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये अतिवृष्टीमुळे पावसाबाबत हाय अलर्ट जरी करण्यात आला आहे. त्यासोबतच उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, सिक्कीम, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि सर्व ईशानेकडील राज्यांमध्ये अति मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार! या भागात होणार अतिवृष्टी, पहा आजचा हवामान अंदाज”

Leave a Comment

error: Content is protected !!