शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! कांद्याच्या दरात तुफान वाढ, पहा कांद्याचे नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market Price: दिवाळीमुळे आठवडाभर बाजार समिती बंद असल्यामुळे कांद्याच्या खरेदी विक्रीवर मोठा प्रभाव पडला आहे. गेला उन्हाळी हंगामात कांद्याच्या उत्पादनात झालेली घट आणि परतीच्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा नसल्यामुळे कांद्याचे खरेदी विक्रीची साखळी विस्कळीत झाली आहे. बाजारात कांद्याचा तुटवड निर्माण झाल्यामुळे कांदा 100 रुपये किलोवर गेला आहे. कांद्याच्या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होत असून शेतकऱ्यांना देखील होत आहे. आणखीन दोन महिने कांद्याच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

👇👇👇

आजचे कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

दिवाळीच्या काळात आठवडाभर बाजार समितीमध्ये कांद्याची खरेदी विक्री बंद होती. त्यामुळे दरवर्षी दिवाळीनंतर कांद्याचे खरेदी विक्रीची साखळी विस्कळीत होऊन दरात वाढ होत असते. यंदा उन्हाळी हंगाम्यात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांदा फारसा शिल्लक राहिला नाही. खरीप हंगामातील कांद्याची काढणी सुरू झाली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊन पूर्ण शेतातील पिकांचे 50% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

👇👇👇

सध्या कांद्याच्या बाजारात खरीप हंगामातील कांद्याची आवक सुरू झाली आहे. पण सरासरीच्या तुलनेत 50 टक्केच अवक होत आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. या कारणामुळे कांद्याच्या दरात तुफान वाढ होत आहे. उन्हाळी कांद्याचा हंगाम संपला आहे, पण खरीप कांद्याची आवक कमी प्रमाणात होत असल्यामुळे दरात पुन्हा तेजी आली आहे. पुढील दोन महिने कांद्याच्या दरात अशीच तेजी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जानेवारीनंतर उन्हाळी कांद्याच्या आवक सुरू झाल्यावर कांद्याचे दर कमी होतील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

👇👇👇

कांद्याचा राखीव साठा कुठे गेला

केंद्र सरकारने ग्राहकांना स्वस्तात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी कांद्याचा मोठा साठा केला होता. नाफेड आणि एनसीसीएस च्या माध्यमातून पाच लाख टन कांदा खरेदी केल्याचे सांगण्यात आले होते. साधारण 1600 ते 3000 रुपये क्विंटल दराने हा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला होता. हा कांदा नेमकं कुठे गेला हा प्रश्न शहरी भागातील नागरिक विचारत आहेत. राखीव कांदा बाजारात का आणला जात नाही हाच प्रश्न सर्वांना पडत आहे. Onion Market Price

👇👇👇

खरंतर राखीव साठ्यासाठी केलेले कांद्याचे खरेदी हा गैरववहार आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त 50 ते 55 रुपये दराने व्यापारी कांदा खरेदी करत आहेत. तो कांदा मुंबईत येईपर्यंत शंभर रुपये किलो कसा होतो असा प्रश्न सरकारला विचारायला पाहिजे. सरकारच्या आशीर्वादाने दरवर्षी शेतकरी आणि ग्राहकांची लूट करून व्यापाऱ्यांचे खिसे भरले जातात. त्यामुळे आता ग्राहकांनी सरकारला ज्या विचारला पाहिजे असे मत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष यांनी व्यक्त केले आहे.

👇👇👇

आजचे कांद्याचे दर काय?

आज छत्रपती संभाजी नगर मध्ये कांद्याला एक लाख 45 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. आज त्रिपुर मध्ये 2700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. पारनेर मध्ये तीन हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल, पुणे मध्ये 4250 रुपये प्रति क्विंटल, कामठी मध्ये पाच हजार रुपये प्रतिक्विंटल, कराडमध्ये तीन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल, नागपूर मध्ये 3750 रुपये प्रति क्विंटर, पिंपळगाव मध्ये 3500 रुपये प्रति क्विंटल, नाशिक मध्ये 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!