उद्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार.! या भागात होणार जोरदार पाऊस – पंजाबराव डख December 20, 2024December 20, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Panjabrao Dakh News: राज्यातील ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज आला आहे. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. उद्या म्हणजे 21 डिसेंबर रोजी राज्यातील विदर्भाकडून अवकाळी पावसाला सुरुवात होणारा आहे. पुढील तीन दिवस विदर्भात अवकाळी पाऊस पडणार आहे असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. राज्यातील यवतमाळ चंद्रपूर वर्धा गडचिरोली छत्तीसगड नागपूर या भागात जोरदार पाऊस पडणार आहे. विदर्भ आणि नागपूर मध्ये जवळपास 24 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस राहील. 24 तारखेला वातावरणात थोडासा बदल होणार आहे आणि त्यानंतर मात्र राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 👇👇👇👇 राज्यातील या जिल्ह्यांमध्ये होणार अवकाळी पाऊस पंजाबराव यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे 25 तारखेपासून राज्यातील मराठवाडा सहित पश्चिम महाराष्ट्राकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. 25 डिसेंबर पासून मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाची व्याप्ती वाढत जाणार आहे. मराठवाडा जळगाव छत्रपती संभाजी नगर जालना अमरावती अकोला वर्धा बुलढाणा परभणी अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर या भागात 25 तारखेपासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे असे पंजाबराव यांनी सांगितले महाराष्ट्र राज्यात जवळपास 26 ते 27 तारखेपर्यंत पाऊस पडणार असल्याचे डख यांनी स्पष्ट केले आहे. Panjabrao Dakh News 👇👇👇👇 राज्यातील या जिल्ह्यांमध्ये होणार अवकाळी पाऊस 21 डिसेंबर पासून 26 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील या भागात पाऊस पडणार असल्याचा पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच या काळात राज्यात सर्वत्र पाऊस पडणार असून भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन योग्य पद्धतीने करावे असा सल्ला यावेळी डख यांनी दिला आहे. दुसरीकडे पुणे वेधशाळेने देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 👇👇👇👇 राज्यातील या जिल्ह्यांमध्ये होणार अवकाळी पाऊस पुणे वेधशाळे ने सांगितल्याप्रमाणे राज्यात 20 डिसेंबर रोजी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथा परिसर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेणे बंधनकारक आहे. जेणेकरून कांदा पिकाचे नुकसान होणार नाही. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “उद्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार.! या भागात होणार जोरदार पाऊस – पंजाबराव डख”