पीएम किसान योजनेत नवीन नियम लागू, सर्व शेतकऱ्यांसाठी जाणून घेणे महत्त्वाचे…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana New Rule: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देणारी सर्वात मोठी पी एम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. नवीन नियमावलीनुसार वारसा हक्क वगळता 2019 पूर्वी जमीन खरेदी केलेली असेल तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान पीएम किसान योजनेसाठी नाव नोंदणी करताना पती-पत्नी व मुलाचे आधार कार्ड सोबत देणे आवश्यक आहे. पी एम किसान योजनेच्या नवीन नियमानुसार शेतकरी कुटुंबातील फक्त एकाच सदस्यांना लाभ दिला जाणार आहे. केंद्र सरकारने 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जात आहेत. PM Kisan Yojana New Rule

पी एम किसान योजनेच्या आधारे राज्य शासनाने ही एक नवीन योजना सुरू केली आहे. पी एम किसान योजनेच्या व राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये आर्थिक मदत मिळते. पी एम किसान योजनेअंतर्गत एका वर्षात लाभार्थी शेतकऱ्यांना तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळत आहेत. या योजनेत शेतकरी म्हणून एकच कुटुंबातील पती किंवा पत्नी अथवा अठरा वर्षाच्या वरील मुलांना लाभ दिला जात आहे.

पी एम किसान योजनेच्या नवीन नियमानुसार उताऱ्यावर 2019 पूर्वीची नोंद असेल किंवा वारसा हक्काने नोंद झालेली असेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मात्र या योजनेत लाभ घेण्यासाठी पती-पत्नी व मुलगा तसेच 2019 नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरवाशी कडून जमीन आपल्या नावावर असल्याचे दाखवून दोन्हीकडून लाभ घेत असल्याचे निदर्शनात आले आहे.

पी एम किसान योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले असेल तर कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. PM Kisan Yojana

पी एम किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • शेतकऱ्याचा नवीन सातबारा उतारा.
  • शेतकऱ्याचा 8 अ.
  • लाभार्थी शेतकऱ्यांच्या पती-पत्नीचे आधार कार्ड.
  • शेतकऱ्याचा फेरफार.
  • वहीत नमुना अर्ज.
  • रेशन कार्ड.

Leave a Comment